आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना‎:गुणवत्ता वाढीसाठी‎ 19 शाळांची तपासणी‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९‎ शाळांमध्ये गुणवत्तेबाबत गंभीर बाबी‎ समोर अाल्या. यानंतर शनिवारी‎ गटशिक्षणाधिकारी किशोर‎ वायकोळे यांनी तातडीने केंद्र‎ प्रमुखांची अाॅनलाईन बैठक घेतली.‎ साेमवारपासून १९ शाळांकडे‎ गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न‎ करावे. त्यासाठी दर महिन्याला‎ तपासणी करावी, असे आदेश दिले.‎ ‘एक दिवस शाळेसाठी’ या‎ उपक्रमात १९ शाळांमधील अनेक‎ विद्यार्थ्यांना नीट लिहिता, वाचता‎ येत नाही असे धक्कादायक वास्तव‎ समोर आले.

यानंतर वायकोळे यांनी‎ शनिवारी सर्व केंद्र प्रमुखांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ऑनलाइन बैठक घेतली. त्यांना‎ सोमवारपासून १९ शाळांना भेटी देत‎ तेथील मुख्याध्यापक, शिक्षकांची‎ बैठक घ्यावी. शाळेची गुणवत्ता‎ वाढीच्या सूचना द्याव्या असे‎ सांगितले. तसेच दर महिन्याला १९‎ शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता‎ तपासणी होईल असे सांगितले.‎

सोमवारपासून‎ नियमित आढावा‎
साेमवारपासून शाळांना भेटी‎ देणे सुरू होईल. विद्यार्थ्यांची‎ शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी‎ नियोजन व त्यानुसार‎ अंमलबजावणी करू. आम्ही‎ स्वत: देखील शाळांना अचानक‎ भेटी देणार आहोत.‎ -किशाेर वायकाेळे,‎ गटशिक्षण अधिकारी, भुसावळ‎

बातम्या आणखी आहेत...