आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र निदर्शने:200 लोको पायलट्सची भुसावळात तीव्र निदर्शने; डीआरएम कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल सिग्नल पास झाल्याने रेल्वे प्रशासनाने तीन लोको पायलट यांना थेट कार्यमुक्त केले. या मनमानीचा निषेध म्हणून सुमारे २०० लोको पायलटांनी मंगळवारी येथील डीआरएम कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधिया, एस.बी. पाटील, ए.के.तिवारी, के.पी, चौधरी, अजय मालवीय, आर.के. मेघराज, प्रवीण पाटील, किशोर कोलते, ललित मुथा आदी उपस्थित होते. सर्वांनी डीएआरच्या प्रकरणात रेल्वे बोर्डाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करावे, मेमू गाडीत सहायक लोको पायलटची ड्युटी लावावी, वाढलेल्या गाड्यामुळे नवीन भरली जावी, रनिंग स्टॉफच्या रिक्त जागा भराव्या, मालगाडीवरील स्टॉफला मुख्यालयातून थ्रू चालवणे बंद करावे, खंडवा येथील रनिंग रूमध्ये नवीन बेडची व्यवस्था, रनिंग रूममधील जेवणाची गुणवत्ता सुधारावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...