आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:खंडित वीजपुरवठा ; शिवसैनिक फासणार अधिकाऱ्यांना काळे

वरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गणपती उत्सव सुरु आहे. तरीही वरणगाव शहरात पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी महावितरणचे कार्यालय गाठून घोषणाबाजी केली. गणेशोत्सवात सुरळीत वीजपुरवठा न केल्यास अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा रविवारी निवेदनातून दिला.गणेशोत्सवामुळे सायंकाळी अनेक भाविक गणपती पाहण्यासाठी मुलाबाळांना घेऊन घराबाहेर पडतात. रात्रीच्या वेळी गणपतीची आरती करण्याच्या वेळी वीज गायब होते. या प्रकारामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे.

त्यामुळे तांत्रिक दोष दूर करून अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी आहे. महावितरण कंपनीने सण उत्सवात सुरळीत वीजपुरवठा करावा. अन्यथा महावितरणच्या अभियंत्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, अल्पसंख्याक संघटक शेख सईद, सुनील भोई, सुनील देवघाटोळे, कृष्णा पुजारी, राहुल वंजारी, वैभव लोखंडे, दीपक शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

बातम्या आणखी आहेत...