आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:चुंचाळे, बोराळे येथील तक्रारींची चौकशी करा; संविधान रक्षक दलाने केली मागणी

यावल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चुंचाळे व बोराळे येथील विविध तक्रारींची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन संविधान रक्षक दलाकडून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयांना देण्यात आले. तत्काळ चौकशी न केल्यास २५ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा त्याद्वारे दिला आहे.

जळगाव युनिटने या संदर्भात निवेदन दिले. त्यात तालुक्यातील विविध प्रश्न उपस्थित करत भीम आर्मी संविधान रक्षक दल जिल्हा युनिटच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली. बोराळे ग्रामपंचायत येथे सन २०१० ते २०२२ पर्यंत झालेल्या सर्वच विकास कामांची चौकशी करा व कार्य अहवाल सादर करा. तसेच चुंचाळे (गायरान) येथील चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या गौण खनिजांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, चुंचाळे येथील रहिवासी विठ्ठल अवचार यांचे घरकुल चार-पाच वर्षांपासून प्रलंबित आहे.

या वर्षी त्यांचे धनादेश अडवले आहेत. तर त्यांची जागा काढून द्यावी व त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी तत्काळ चौकशी न झाल्यास २५ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान याबाबत आश्वासन दिल्याची माहिती संविधान रक्षक दलाने दिली. निवेदन देते प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, तालुका संघटक राजू वानखेडे, जोयेब शेख, भरत परदेशी, विठ्ठल अवचार व सुपडू संदानशिव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...