आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:निकृष्ट कामांची चौकशी‎ करा; अन्यथा उपोषण करू‎

वरणगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिध्देश्वर नगरात पालिकेच्या माध्यमातून‎ काँक्रीटचे रस्ते व गटारीचे बांधकाम‎ करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच‎ या कामाचा दर्जा उघड पडला. रस्त्यावर‎ खड्डे पडले असून गटारीचे बांधकाम‎ ढासळत आहे. या कामांची चौकशी‎ करून दोषींवर कारवाई करावी अशी‎ मागणी आहे.‎ सिद्धेश्वर नगर भागात चार महिन्यांपूर्वी‎ पालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटचे‎ रस्ते व गटारीचे बांधकाम करण्यात आले‎ आहे.

मात्र, अवघ्या काही दिवसांतच‎ निकृष्ट कामे झाल्याचे समोर आले.‎ कारण, काँक्रिटच्या रस्त्यावर खड्डे पडत‎ असून ठिकठिकाणी गटारीचे बांधकाम‎ ढासळत आहे. याबाबत‎ सिध्देश्वरनगरातील रहिवाशांनी‎ पालिकेकडे वारंवार चौकशीची मागणी‎ केली.

मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला‎ नाही. यामुळे बाळू माळी, यशवंत बढे,‎ उमाकांत झांबरे, नीलेश काळे, विक्की‎ मोरे, संतोष पाटील, दीपक कोळी, सुनील‎ साबळे हे २४ डिसेंबर रोजी वरणगाव‎ बसस्थानक चौकात उपोषणास बसणार‎ आहेत. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी,‎ तहसीलदारांना निवेदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...