आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​गौराईचे आगमन:अनुराधा नक्षत्रात आज सकाळी 9 ते रात्री 9 करा श्री महालक्ष्मींचे आवाहन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता गृहिणींना वेध लागले आहेत ते श्री महालक्ष्मी (गौरी) आवाहनाचे. ३ सप्टेंबरपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे. शनिवारी अनुराधा नक्षत्रात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत गौरीचे आवाहन करता येणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत या सणाच्या खरेदीसाठीही नागरिकांची लगबग वाढली आहे. स्टील आणि लोखंडाचे भाव वाढल्याने यंदा कोठ्यांच्या किमती ४०० ते १५०० रुपयांपर्यंत पोहाेचल्या आहेत. महालक्ष्मीचे मुखवटे, मखर साज सात ते आठ हजारांपर्यंत खर्च येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवट्यांच्याही किमती यंदा वाढल्या असल्याची स्थिती आहे.

लोखंड व स्टीलचे दर वाढल्याने पीओपीच्या मुखवट्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी सुंदर लक्षवेधक मुखवटे बाजारात विक्रीसाठी ठेवले आहे. गेल्या वर्षी लोखंडी धातूच्या कोठ्या ११०० ते १२०० रुपये होत्या त्या आता १५०० रुपयांपर्यंत पोहाेचल्या आहेत. स्टीलच्या कोठ्याही २०० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहे. बाजारात गौराईसाठी मुखवटे, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, कर्णफुले, माळा हे दागिने तसेच आरास करण्यासाठी विविध वस्तू उपलब्ध असल्याचे फुले मार्केटमधील महिला सहकारी मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

तीन दिवस असे केले जाते गाैरीचे पूजन
बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. यासह सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले. कोठ्यांवर मातीचा मुखवटा चढवला जातो. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात. तीन दिवस त्यांचे मनोभावे पूजन केले जाते. या उत्सवात नातेवाईक एकत्र येतात.म

महालक्ष्मी पूजन का?... गणपती रिद्धी-सिद्धीसह आल्याने भक्तांना विद्या प्राप्ती होते. तसेच महालक्ष्मीमुळे सौभाग्याचे रक्षण होते. लक्ष्मीची कृपादृष्टी अखंड राहण्यासाठीही महालक्ष्मीचे पूजन केले जाते. भाद्रपद सप्तमी, अष्टमी, नववी असे तीन दिवस हा सण असतो. त्यात १६ अंकाला विशेष महत्त्व असते. महानैवेद्यात १६ पदार्थ केले जातात. १६ सुताचा धागा हातात बांधला जातो.

बातम्या आणखी आहेत...