आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसा सिंचन योजना:ओझरखेडा तलावासाठी यंदा पाणी उचल अशक्य

भुसावळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेवरील ओझरखेडा साठवण तलावात यंदा देखील ३० टक्के साठा करण्याचे नियोजन आहे. ३० टक्के साठा केल्यास तलावाची पातळी २६८ मीटर असते. मात्र, सध्या धरणातील पाण्याचा वापरच नसल्याने २६७ मीटर पातळी टिकून आहे. त्यामुळे यंदा पाणी उचल होण्याची शक्यता कमीच असल्याचे समोर आले.

वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवर सन २०१८ मधील पावसाळ्यात हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी प्रथम उचलले गेले होते. सन २०२२ च्या पावसाळ्यात धरणात किमान ७० टक्के साठा होणे अपेक्षित होते. मात्र, साठा वाढवल्यास ओझरखेडा साठवण तलावाच्या परिसरातून जाणारा हरताळे-माळेगाव रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे यंदा देखील फक्त ३० टक्के साठा होणार आहे. मात्र, गेल्या वर्षी तलावात केलेल्या साठ्यातून जलपातळीपैकी केवळ एक मीटरने खालावली आहे. वापरच झालेला नसल्याने यंदा ओझरखेडा धरणात पाणी सोडले जाईल का? हा प्रश्न आहे. या धरणातील पाण्याच्या उपयोगासाठी बंदिस्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले नाही. तसेच दीपनगर वीज केंद्रालाही पाणीपुरवठा होत नाही.

दीपनगर केंद्रासाठीच्या जलवाहिनीचे भिजत घोंगडे
ओझरखेडा साठवण तलावातून दीपनगर औष्णिक केंद्राला पाणीपुरवठा नियोजित आहे. यासाठी पाइपलाइन टाकली आहे. विजेचा वापर न करता गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने हा पुरवठा होईल. मात्र, पिंप्रीसेकम व फुलगाव येथील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने या पाइपलाइनचे भिजत घोंगडे आहे. परिणामी ओझरखेडा तलावातील पाण्याचा वापर होत नाही.

बातम्या आणखी आहेत...