आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगले संस्कार, चांगल्या सवयी बालपणात लागतात. शाळांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून मुले घडतात. त्यास पालकांनी देखील सहकार्य करावे. अभ्यासासोबतच मुलांच्या इतर कलागुणांना वाव द्यावा, असा सल्ला लेवा समाज युवक सेवा मंडळ संचालित चंद्रकांत हरी बढे प्राथमिक विद्यामंदिरात संस्थेचे सचिव चंद्रशेखर झोपे यांनी दिला. बालआनंद मेळाव्यात ते बोलत होते. शाळेतील या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे ३९ स्टॉल्स लावले होते. या या स्टॉल्सचे उद्घाटन चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते झाले.
संस्थेचे सभासद प्रदीप भंगाळे, प्रशांत झोपे, मुख्याध्यापक पंकज पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या मदतीने पाणीपुरी, भेळ, ढोकळा, समोसे, कचोरी, सोयाबीन चिल्ली, पोहे, उपमा, वडापाव असे पदार्थ तयार करून मिळालेल्या रकमेतून खरी कमाईचे प्रात्यक्षिक अनुभवले. प्रास्ताविक मुख्याध्यापक पंकज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप जमदाडे, यांनी तर आभार सतीश इंगळे यांनी मानले. जहीर पठाण, प्रतीक्षा भोगे, जयश्री पाटील, रत्ना चौधरी, अनिल सरोदे, सुभाष झोपे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.