आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कता:भुसावळात अनधिकृत नळजोडणीचे‎ काम संतप्त नागरिकांनीच थांबवले‎

भुसावळ‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडका रोडवरील १२ इंची मेन‎ रायझिंग पाइपलाइनवरुन केवळ एक‎ इंची कनेक्शनची परवानगी आहे.‎ तरीही तीन इंची कनेक्शनची परस्पर‎ जोडणी सुरू असल्याचे काम‎ परिसरातील नागरिकांनी मंगळवारी‎ दुपारी थांबवले. एका ठेकेदाराने‎ कर्मशिअल कॉम्पलेक्समध्ये ही‎ जोडणी सुरू केली होती. पण, या‎ जोडणीनंतर परिसरातील बी.झेड उर्दू‎ हायस्कूलची गल्ली, दत्तनगर‎ परिसर, डॉ. युनुस फलाई गल्ली,‎ बागवान गल्ली, पटेल कॉलनीत‎ कमी दाबाने पाणी मिळण्याची‎ शक्यता असल्याने रहिवाशांनी त्यास‎ विरोध केला.‎ गडकरी नगर भागातून‎ खडकारोड रजा चौक परिसरापर्यंत‎ पाणीपुरवठा करण्यासाठी १२ इंची‎ मुख्य पाइपलाइन टाकली आहे.

मात्र‎ या पाइपलाइनवरुन परवानगी‎ नसताना तीन इंची कनेक्शन‎ जोडण्याचे काम मंगळवारी परस्पर‎ सुरू करण्यात आले. याची माहिती‎ मिळताच तेथे जमलेल्या‎ परिसरातील रहिवाशांनी या पद्धतीने‎ नळ कनेक्शन जोडणीस विरोध‎ दर्शवला. हे काम करण्यासाठी‎ आणलेल्या जेसीबीसमोर नागरिक‎ उभे राहिले. परिणामी नळ कनेक्शन‎ जोडणीचे काम थांबले.

यापूर्वी‎ देखील संबंधित व्यापारी संकुलाच्या‎ मालकाने पाइपलाइन जोडण्यासाठी‎ प्रयत्न केला होता. पण, तो‎ नागरिकांनी हाणून पाडला होता.‎ यानंतर मंगळवारी पुन्हा ही जोडणी‎ होत असल्याचे निदर्शनास आल्याने‎ नागरिक संतप्त झाले. त्यांनी‎ पालिकेकडे संपर्क साधून हे काम‎ थांबवण्याची मागणी केली. पण,‎ पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी‎ पोहोचले नाहीत. प्लंबर व जेसीबी‎ चालकाने काढता पाय घेतला.‎

संकुलामागील भागासाठी पाइपलाइनचे काम हाेते, रहिवाशांचा गैरसमज झाला‎ व्यापारी संकुलाच्या मागील १५ ते २०‎ घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी‎ पालिकेच्या माध्यमातून तीन इंची‎ पाइपलाइन टाकली जात होती.‎ मात्र, या व्यापारी संकुलात कनेक्शन‎ देत असल्याचा रहिवाशांचा‎ गैरसमज झाला. आम्ही तूर्त हे काम‎ बंद केले अाहे. या भागाला इतर‎ भागांतून नळजोडणी दिली जाईल,‎ असे पालिकेचे पाणीपुरवठा‎ अभियंता सतीश देशमुख यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...