आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष:घरकाम करणाऱ्या 14 वर्षीय‎ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गर्भवती; पोस्कोनुसार गुन्हा दाखल

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरकाम करणाऱ्या 14 वर्षे 3 महिने‎ वयाच्या अल्पवयीन मुलीवर‎ लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने‎ अत्याचार करण्यात आला. त्यात‎ पीडिता महिन्यांची गर्भवती‎ राहिल्याची धक्कादायक बाब‎ उघडकीस आली आहे.

या प्रकरणी‎ संशयित इम्रान मुख्तार सैय्यद (वय‎ 22, रा.भुसावळ) याच्यावर‎ भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात‎ पोस्कोचा गुन्हा दाखल झाला.‎ शहरातील एका भागातील‎ अल्पवयीन मुलीला जानेवारी 2023 पूर्वीच्या चार महिन्यांआधी संशयित‎ इम्रान मुख्तार सय्यद याने मामाच्या‎ घरात इशारा करून बाेलावले.‎

तिच्याशी गप्पा करून लग्नाचे‎ आमिष दाखवले. यानंतर‎ तिच्यासोबत जबरदस्तीने‎ शरीरसंबंध ठेवले. पीडितेसोबत‎ सेल्फी काढून त्या इन्स्टाग्रामवर‎ ठेवल्या. दरम्यान, पीडिता चार‎ महिन्यांची गर्भवती राहिली. आपली‎ फसवणूक झाल्याचे लक्षात‎ आल्याने तिने बुधवारी (दि.2) रात्री‎ तालुका पोलिस ठाणे गाठून पोलिस‎ निरीक्षक विलास शेंडे यांच्याकडे‎ हकीकत सांगितली. तिच्या‎ फिर्यादीवरून संशयीताविरूद्ध‎ पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल‎ केला. तपास सहायक निरीक्षक‎ प्रकाश वानखडे करत आहेत.‎