आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन वितरण:जुलैचा धान्य साठा दुकानांत उपलब्ध;  ई-पॉस मशीन बंद, रेशन वितरण ठप्प

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रेशन दुकानांमध्ये जुलै महिन्याचा धान्यसाठा भरला आहे. मात्र, आठवड्यापासून ई-पाॅस मशिन बंद असल्याने धान्य वितरण ठप्प आहे. दुसरीकडे रेशनच्या धान्यासाठी कार्ड धारकांचा तगादा मात्र वाढला आहे.

मध्यंतरी दुकानांमध्ये धान्य साठा उपलब्ध नव्हता. धान्य वितरण करणाऱ्या ठेकेदारांनी काम बंद केल्याने वितरण व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा गोदामामधून धान्य पोहोचवणे सुरू झाले. यामुळे शहरातील दुकानांमध्ये जुलै महिन्यातील धान्यसाठा प्राप्त झाला. पण, ई-पॉस मशिन बंद असल्याने हा साठा ग्राहकांना वाटायचा कसा? हा नवीन प्रश्न तयार झाला आहे. कारण ई-पॉस मशीन बंद असल्याने ग्राहकांचा अंगठ्याचा थम येत नाही.

अडचणी मांडल्या सर्व अडचणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कानी घातल्या आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार लवकरच मशीन अपडेट होतील. महेंद्र सपकाळे, अध्यक्ष, रेशन दुकान संघटना

बातम्या आणखी आहेत...