आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:कंडारी सरपंच सुवर्णा‎ कोळी ठरल्या अपात्र‎

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎कंडारी (ता.भुसावळ) येथील‎ सरपंच सुवर्णा नितीन कोळी यांचे‎ यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र‎ बनावट असल्याने धुळे येथील‎ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र‎ समितीने ७ सप्टेंबर रोजी रद्द केले‎ होते. हे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने‎ त्यांना सरपंच पदावरुन अपात्र‎ करावे, अशी तक्रार दीपक तायडे‎ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली‎ होती. या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी‎ अमन मित्तल यांनी सरपंच‎ अपात्रतेचे आदेश दिले आहेत.‎

कंडारी येथील सरपंच सुवर्णा‎ शांताराम सोनवणे उर्फ सुवर्णा‎ नितीन कोळी यांच्या जात‎ प्रमाणपत्राबाबत दीपक तायडे यांनी‎ तक्रार केली होती. या तक्रारीच्या‎ अनुषंगाने धुळे येथील अनुसूचित‎ जमाती प्रमाणपत्र समितीने हे‎ प्रमाणपत्र पोलिस पक्षता पथकाच्या‎ चौकशीत बनावट असल्याचे सिद्ध‎ झाले होते. यामुळे हे प्रमाणपत्र रद्द‎ करण्याचे आदेश ७ सप्टेंबरला दिले‎ होते. यानंतर तक्रारदार दीपक तायडे‎ यांनी सुवर्णा कोळी यांचे जात‎ प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांना‎ सरपंच पदावरुन अपात्र करावे,‎ अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे‎ केली होती. जिल्हाधिकारी अमन‎ मित्तल यांनी ३१ ऑक्टोबरला‎ अर्जदाराचा अर्ज मंजूर केला.‎

बातम्या आणखी आहेत...