आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक पौर्णिमा:ग्रहणामुळे सकाळी 9.30 ते रात्री 8 पर्यंत कार्तिकस्वामी मंदिर बंद

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक स्वामींचे वर्षभरातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला दर्शन घेता येते. मात्र, यंदा कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे शहरातील म्युनिसिपल पार्कमधील श्रीराम मंदिरातील कार्तिक स्वामींचे मंदिरात सकाळी ५.३० ते ९.३० आणि रात्री ८ ते १०.३० या वेळेतच दर्शन घेता येईल. सकाळी ९.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्रहण काळात मंदिर दर्शनासाठी बंद असेल.

मंगळवारी कार्तिक पौर्णिमा आहे. तत्पूर्वी, साेमवारी मंदिरात कार्तिक स्वामींच्या मूर्तीची पूजा हाेईल. यानंतर साेमवारी दुपारी ३.३० ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे राहील. दरम्यान, दरवर्षी मंदिरात भाविकांची कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी होते. यंदा मात्र चंद्रग्रहण असल्याने ग्रहण काळात मंगळवारी सकाळी ९.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद राहतील. कार्तिक स्वामी मंदिराचे पुजारी पंडीत सुनील पांडे म्हणाले की, मंगळवारी पहाटे ५.३० वाजता मंदिर कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी उघडले जाईल.

यानंतर सकाळी ९.३० वाजेपासून ग्रहणाचा सूतककाळ सुरू होताच मंदिर बंद होईल. ते ग्रहण सुटल्यावर रात्री ८ वाजता उघडून भगवंतांच्या मूर्तीच्या अभिषेक करण्यात येईल. यानंतर रात्री १०.३० वाजेपर्यंत पुन्हा भाविकांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येईल.वर्षातून एकदाच दर्शन : महिलांना वर्षभरातून केवळ एकदाच कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. अन्य वेळी कार्तिकस्वामी गर्भगृहामध्ये विराजमान राहतात.

यंदा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहणापूर्वी १२ तास आधी सूर्याेदयापासून ग्रहणाचे वेध लागतात. चंद्रग्रहण दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.कार्तिक स्वामींना माेरपिस प्रियकार्तिक स्वामींचे दर्शन घेताना अनेक भाविक त्यांना मोरपीस अर्पण करतात. यावेळी दोन मोरपीस सोबत आणून त्यातील एक कार्तिक स्वामींना अर्पण केले जाते. दुसरे मोरपीस सोबत घरी नेऊन देवघरात ठेवतात.

बातम्या आणखी आहेत...