आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:पीक कर्ज वाटप कालावधीत सर्व एटीएममध्ये रक्कम ठेवा : शिवसेना

बोदवड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या कालावधीत बोदवड तालुक्यातील एटीएममध्ये २४ तास रोख रक्कम उपलब्ध ठेवा, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना निवेदन दिले.

जिल्हा सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. २०१८ पासून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड पुरवले आहेत. त्यामुळे पीक कर्जाची रक्कम एटीएममधून काढावी लागते. मात्र, जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कुठेही एटीएम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमचा आधार घ्यावा लागतो. मात्र, तेथे रोख रक्कम नसल्यास शेतकऱ्यांची अडचण होते.

त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या काळात एटीएममधील रक्कम संपणार नाही, याची दक्षता घेणे. ज्या शेतकऱ्यांना एटीएम वापरण्यात अडचणी येत असतील त्यांच्यासाठी बँकेतून कर्जाची रक्कम अदा करावी, अशी मागणी शिवसेनेचो तालुका संघटक शांताराम कोळी, नगराध्यक्ष आनंदा पाटील, संजय गायकवाड, प्रितेश बरडिया, विनोद पाडर, राहुल शर्मा, गोपाळ पाटील, राजेश नानवाणी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...