आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञान आणि संस्कारांशिवाय जीवन शून्य आहे. संस्कार व ज्ञानच मनुष्याला श्रेष्ठ बनवते. कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्याच्यावर झालेल्या संस्कारावर आणि त्यांनी मिळविलेल्या ज्ञानावर अवलंबून असते. समाजहित तसेच देशहित सांभाळण्यासाठी संस्काराची शिदोरी प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यामुळे शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी असून ती सोबत ठेवण्याचे आवाहन, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था संचालक तथा बलवाडी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील होते.
प्राचार्य आर.जे.पाटील, उपमुख्याध्यापक एस.डी.चौधरी, पर्यवेक्षक पी.आर.महाजन, प्रा.जी.यू. कंखरे, प्रा.जे.डी.महंत, स्थानिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जी.आर. महाजन, डी.बी. चौधरी उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय वाय.आर. महाजन यांनी करून दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व अनेक विचारांचा निर्माता आहे. ज्ञानाच्या कौशल्याने विविध क्षेत्रात तो प्रगती करू शकतो. शिक्षणाचे उद्दिष्ट हे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे असा अाहे. त्यासाठी उपजत व संपादित क्षमता व कौशल्ये प्राप्त करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात एन.व्ही. पाटील यांनी भविष्यकालीन शिक्षणविषयक माहितीचा वेध घेवून विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.