आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणदणीत विजय:कुऱ्हा येथे खडसेंचा शिंदे गट-भाजपला दणका

मुक्ताईनगर/कुऱ्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कुऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते डॉ.राजेंद्र फडके यांना धोबीपछाड दिला. या ग्रामपंचायतींमध्ये १७ पैकी १३ जागांसह लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादीचे डॉ.बी.सी.महाजन यांनी दणदणीत विजय मिळवला.

महाजन यांना २८०६ तर भाजप-शिंदे गटाचे भागवत दगडू राठोड यांना १६२७ मते मिळाली. महाजन हे तब्बल ११७९ मतांनी विजयी झाले. निकालानंतर भाजपच्या गडाला सुरूंग लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर शहर व कुऱ्हा गावात जल्लोष केला. उचंदा ग्रा.पं.कोणाकडे हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

कुऱ्हा येथील विजयी सदस्य
प्रभाग १ : फकीर कदीरशा खुदुशा ३७६, शेख शबानाबी शेख इरफान ३७३, प्रभाग २ : शांताराम बळीराम इंगळे ३६५, अनिता सत्येश्वर नागरे ४०६, हजराबी अब्दुलशा फकीर ३६३, प्रभाग ३ : एक बिनविरोध, द्वारका संतोष श्रीनाथ ३६१, संध्या गजानन खिरळकर ४१६, प्रभाग ४ : विनोद मधुकर सोनवणे ४२४, पूजा अविनाश वाढे ४१२, गजानन वासुदेव कवळे ४४८, प्रभाग ५ : ज्योती अरुण काकडे ५७६, रंजना रमेश माहूरकर ४५५, गजानन शंकर पाटील ५३३, प्रभाग ६ : बडुगे प्रभूसिंग शिवसिंग ३४७, सुषमा जनार्धन मदाने २९६, गौतम रवींद्रसिंह डिगंबरसिंह २९७.

बातम्या आणखी आहेत...