आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता:खिरोदा ;काँग्रेसने हिसकावली भाजपकडून ग्रामपंचायतीची सत्ता

रावेर/चिनावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपच्या ताब्यात असलेली खिरोदा प्र.यावल (ता.रावेर) ही ग्रामपंचायत यंदा काँग्रेसने काबीज केली. तेथे चिनावल येथील प्रा. मनीषा मनोज चौधरी या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या.

त्यांना एकूण १२६१ मते मिळाली. त्यांनी चौरंगी लढतीत दीपाली चौधरी, गायत्री इंगळे, अर्चना इंगळे यांचा पराभव केला. काँग्रेसने लोकनियुक्त सरपंच पदासह ७ जागा, दुसऱ्या पॅनलची १, तर भाजपच्या पॅनलच्या ३ आणि २ जागांवर अपक्षांनी बाजी मारली.

बातम्या आणखी आहेत...