आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन तालुक्यातील खडका येथे झाले. ज्ञानज्योती विद्यालयात विद्यार्थिनी मजिरा नाज बागवान आणि सरपंच विलास सपकाळे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात अाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा, सदस्या ललिता चोरडिया, स्थानिक शिक्षण मंडळ खडकाचे अध्यक्ष अनिल वारके, सचिव केशव धांडे आणि ज्ञानज्योती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भिरुड, कोटेचा महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.डी. देसले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी स्वयंसेवी विद्यार्थिनींना एन.एस.एस शिबिरामध्ये स्वयंशिस्त आणि व्यक्तिमत्व विकासासाठी योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक सुनील भिरुड यांनीही विद्यार्थिनींना ग्रामीण विकासासाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले. या सात दिवसीय एन.एस.एस शिबिरात व्यक्तिमत्व विकास, ग्रामस्वच्छता, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.शरद अग्रवाल यांनी केले. आभार प्रतिज्ञा मनोरे हिने मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. नीता चोरडिया, प्रा. वृंदा चौधरी, हरी पाटील तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विलास पाटील, उपप्राचार्य प्रा. यशवंत देसले यांचे सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.