आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:कुऱ्हाड बुद्रूक ग्रा.पं. सरपंचपदी पाटील‎

लोहारा‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील व जामनेर ‎विधानसभा क्षेत्रातील कुऱ्हाड बुद्रूक ‎ ‎ येथे ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांचे खंदे समर्थक तथा‎ माजी सरपंच किरण पाटील, पवन ‎पाटील, राजू राठोड यांच्या राजकीय ‎खेळीला यश मिळाले असून‎ अवघ्या दोनच वर्षात सत्तापालट‎ करून ग्रा.पं.च्या सरपंच पदावर‎ भाजपचा सरपंच विराजमान झाला‎ येथील तत्कालीन सरपंच‎ उदयसिंग लखीचंद वंजारी यांना‎ अतिक्रमण केल्याप्रकरणी‎ जिल्हाधिकारी अभिजित राऊत‎ यांनी अपात्र केल्याने रिक्त जागी‎ निवड करण्यात आली.

यावेळी‎ माजी सरपंच किरण पाटील, पवन‎ पाटील, राजू राठोड यांनी यशस्वी‎ खेळी करत सरपंचपदी शिवाजी‎ बाबूलाल पाटील यांची बिनविरोध‎ वर्णी लावून ग्रा.पं.वर पक्षाचा झेंडा‎ लावला आहे. यावेळी निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून सर्कल‎ प्रकाश डहाके उपस्थित होते.‎

यावेळी नूतन सरपंच शिवाजी‎ पाटील यांची गावातून विजयी‎ मिरवणूक काढली. माजी सरपंच व‎ कट्टर भाजप ग्रामपंचायत सदस्य‎ किरण पाटील, पवन पाटील, राजू‎ राठोड, दीपाली पाटील, रुखमन‎ पाटील, हसीना सरवर मुसलमान,‎ तुकाराम पाटील, शालिक पाटील,‎ आकाश पाटील, विनोद काळे,‎ सुरेश पाटील, कालू‎ मुसलमान,अजित बददु मुसलमान,‎ शेख रूसत शेख, समाधान होळे,‎ अप्पा पाटील उपस्थित होते. नूतन‎ सरपंच शिवाजी पाटील यांच्या‎ निवडीबद्दल राज्याचे ग्रामविकास‎ मंत्री गिरीश महाजन, भाजप पाचोरा‎ तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पक्षनेते‎ संजय पाटील, कैलास चौधरी‎ आदींनी अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...