आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिशक्तीला निरोप:मिरवणुकीस उशिराने सुरुवात, 10 वाजता 15 मंडळांना बंद करावी लागली वाजंत्री; बंद पथदिव्यांमुळे गैरसोय

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी भुसावळकरांनी आदिशक्ती दुर्गामातेला उत्साहात निरोप दिला. यानिमित्त निघालेल्या सार्वजनिक मिरवणुकीसाठी ४१ मंडळांनी नोंदणी केलेली असली तरी प्रत्यक्षात ३६ मंडळे सहभागी झाली. मात्र, मिरवणूक दुपारी ३ ऐवजी दोन तास उशिराने म्हणजेच सायंकाळी ५ वाजता सुरू झाली. पोलिसांनी रात्री १० वाजता मशिदीजवळ वाजंत्री बंद केली तेव्हा मागील १५ मंडळांना विनावाजंत्री केवळ आदिशक्तीचा जयघोष करून विसर्जनासाठी वाघूर आणि तापी नदी गाठावी लागली. आता पुढील वर्षी १५ ऑक्टोबरला आदिशक्तीचे आगमन होईल.

रात्री १० वाजेपर्यंत मिरवणुकीची वेळमर्यादा असल्याने दुपारी १२ वाजता मिरवणूक सुरू करावी, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. उलट जी मिरवणूक दरवर्षी दुपारी ३ वाजता सुरू होते, ती यंदा सायंकाळी ५ वाजता नृसिंह मंदिरापासून सुरू झाली. पहिला क्रमांक स्वराज्य ग्रुप मंडळांचा होता.

पट्टीचे पाेहणारे तैनात
दुर्गा विसर्जनावेळी तापी नदीवर दुर्घटना घडू नये म्हणून पट्टीच्या पोहणाऱ्या ९० जणांचे पथक दुपारी १ वाजेपासून तैनात होते. पालिका व पोलिस कर्मचारी देखील थांबले हाेते. तापी नदीवर २००, तर मिरवणूक मार्गावर १०० हॅलोजन लावून उजेडाची व्यवस्था केली होती. पालिकेने १० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.

दिवे बंद, सर्वत्र अंधार
विसर्जन मिरवणूक मार्गावरील अनेक पथदिवे बंद होते. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी मंडळांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी मंडळांनी जनरेटरवर हॅलोजन दिवे लावले. तसेच महावितरण व पालिकेच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. किमान सण-उत्सवात शहरात उजेड असावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...