आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप:विसर्जन मिरवणुकीत कायदा पाळावा

चिनावल24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनावल हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे प्रत्येकाने कायद्याचे पालन करून गणेश विसर्जन मिरवणूक काढावी. बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप द्यावा, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. चिनावल येथे सातव्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबरला गणपतींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ५ सप्टेंबरला गावात बैठक घेतली.

फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले यांनी घेतलेल्या बैठकीत गावातील सर्व १६ गणेश मंडळांचे प्रतिनिधी व गावातील शांतता समिती सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांना क्रमांक देण्यात आले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले, पोलिस पाटील नीलेश नेमाडे, उपसरपंच परेश महाजन, शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सरोदे, रावेर बाजार समितीचे माजी सभापती गोपाळ नेमाडे, दामोदर महाजन, किशोर बोरोले, सागर भारंबे, संदीप महाजन, प्रेमचंद भारंबे आदी उपस्थित होते. बैठकीत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करून विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्याचे आवाहन सर्वांनी केले. गावातील सर्व १६ गणेश मंडळाचे पदाधिकारी, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, यशवंत डहाके, देवेंद्र पाटील, विनोद पाटील हजर होते.

बातम्या आणखी आहेत...