आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामाचे विचार, आदर्श आचरणात आणले तर पुन्हा रामराज्य निर्माण होईल, असे मत साध्वी सर्वेश्वरी यांनी प्रवचन करताना भाविकांसमोर व्यक्त केले. येथील अष्टविनायक नगरमधील साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त व रामनवमी निमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रामनवमीच्या पावन पर्वावर या साई उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता पूजा, ९ वाजता सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष विजय गोटीवाले यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. कपिल दुबे महाराज यांनी पूजा व मंत्रोपचार म्हटले. दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव व महाआरती झाली. रात्री साध्वी सर्वेश्वरी यांच्या वाणीतून प्रवचनाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
यावेळी आमदार शिरीष चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम पाटील, योगिराज पाटील, जे.के. पाटील, ष दिलीप तोलाणी, राजेंद्र चौधरी, डॉ.डिगंबर पाटील, डॉ.योगेश पाटील, तापी इरिगेशनचे सोपान पाटील, महेंद्र पवार, मुन्ना अग्रवाल,विवरा शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन धनजी लढे, विवरे विकासोचे चेअरमन गोपाळ राणे, मानस कुलकर्णी, योगेश पाटील खिर्डीकर व साई भक्त उपस्थित होते. यशस्वितेसाठी उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अहंकाराचा त्याग केल्यास माणुसकी जपली जाईल
माणसाने माणसाकडे माणुसकीच्या भावनेतून पाहिल्यास जग सुखी होईल. मात्र अहंकार वाढल्याने माणुसकी संपली आहे. अहंकाराने जीवनाचे पतन होते. मात्र भक्तीच्या भवसागराने जीवनाला दिशा मिळते, असे विचार साध्वी सर्वेश्वरी यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.