आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शिक्षक अन् पदवीधरांसारखे आता पोलिसांनादेखील व्हायचयं आमदार

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक व पदवीधरांप्रमाणेच पोलिसांसाठी स्वतंत्र मतदार संघ निर्माण करावा, मोफत वैद्यकीय सेवा, प्रवासात सवलत आदी मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या शांतीदूत सेवानिवृत्त पोलिस सेवा संस्थेने गुरूवारी भुसावळ प्रांतांना निवेदन दिले.

निवेदन देण्यासाठी निवृत्त झालेले सहायक फाैजदार, हवालदार, पाेलिस कर्मचारी प्रांत कार्यालयात एकत्र आले हाेते. या सर्वांनी प्रांतांना निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष शशिकांत चाैधरी, उपाध्यक्ष फारुख शेख, तस्लिम पठाण, चंद्रमणी ढिवरे, हमीद शेख, राजेश वणीकर, नीळकंठ चाैधरी, प्रकाश निकम आदी उपस्थित हाेते.

प्रवासभाड्यात सवलत, मोफत वैद्यकीय सेवा हवी प्रवास भाड्यात ५० ते ७५ टक्के सवलत, सेनादलाच्या धर्तीवर टॅक्स व टोल माफी, सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा, मॅट व खंडपीठाने दिलेल्या विविध न्याय निर्णयानुसार ३० जूनला निवृत्त होणाऱ्या शासकीय सेवकांना १ जुलैची वेतनवाढ लागू करणारा शासन निर्णय पारित करावा, ३० वर्षे सेवा करून निवृत्त झालेले कर्मचारी शासन निर्णयानुसार पीएसआय पदाच्या तिसऱ्या पदोन्नतीस पात्र आहेत.

अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीएसआय पदोन्नती व लाभ देणे, निवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलिस भरतीमध्ये २५ टक्के आरक्षण किंवा एका तरी पाल्यास प्राधान्य देणे, मॅटमध्ये प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक अशा मागण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...