आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रतिसाद अधिक:मतदान कार्डला आधार लिंकिंग; भुसावळ तालुक्यात प्रतिसाद नाही

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरु झाली. त्यासाठी ३१ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत भुसावळ तालुक्यातील ३ लाखापैकी केवळ २० हजार ७८९ मतदारांनी आधार व मतदान कार्ड लिंक केले. म्हणजेच या मोहिमेत भुसावळ तालुका रेड झोन आहे. विशेष म्हणजे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रतिसाद अधिक आहे.

मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. त्यासाठी शहरासह तालुक्यातील ३१३ मतदान बूथवर प्रत्येकी एक बीएलओ कर्मचारी नेमला आहे. मात्र, बीएलओ शहरात मतदारांना भेटतच नसल्याने या प्रक्रियेला अल्प प्रतिसाद आहे. जिल्ह्यातील रावेर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यात चांगला प्रतिसाद आहे. तर भुसावळसह जळगाव शहर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा व जामनेर या तालुक्यांत प्रतिसाद नसल्याने ते रेडझोनमध्ये आहेत.

अशी करा ऑनलाइन लिंकिंग
https://www.nvsp.in यावर लॉग इन करुन तुम्हाला मतदान ओळखपत्र, खासगी माहिती, ईपीसी नंबर आणि स्टेट टाकून सर्च करावे लागेल. यावर दिलेल्या फिड आधार नंबरचा पर्याय सिलेक्ट करुन महत्त्वाची माहिती भरल्यानंतर रजिस्टर्ड नंबर आणि ई-मेलवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकून सबमीटवर क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन मिळेल, ज्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्याची माहिती दिसेल.

बातम्या आणखी आहेत...