आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:स्थानिक शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध

खडका20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडका (ता.भुसावळ) येथील स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १३ जागांवर प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडले. या निवडणुकीत तीन नवीन सदस्यांना संचालकपदाची संधी मिळाली. उर्वरित १० जागांवर जुने संचालक निवडले गेले. आता संचालकांतून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदांची निवड होईल.

खडका स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. यात अनिल वारके, प्रमोद भोळे, केशव धांडे, प्रतापसिंग पाटील, चंद्रकांत सरोदे, सुधीर वारके, आनंदा भोळे, युवराज पाटील, लहानू महाजन, लक्ष्मण सुरवाडे, अशोक पाटील, गणेश महाजन, मनोहर इंगळे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. यासाठी आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, सरपंच विलास सपकाळे, माजी सरपंच चुडामण भोळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश तायडे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक एस.पी.भिरुड, एम.पी.बऱ्हाटे निवडणूक निर्णय अधिकारी होते.

बातम्या आणखी आहेत...