आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा बाजार गजबजला:लग्नासाठी हिऱ्याचे दागिने, नेकलेस खरेदीला पसंती

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशी वि‌वाहानंतर आता २६ नोव्हेंबरपासून लग्नांचा धडाका सुरू होईल. त्यासाठी दागिने खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे सराफा दुकानांवर गर्दी होत असून हिऱ्याचे मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्यांची मागणी वाढली आहे. हिऱ्याच्या मंगळसूत्राची किमत ४० हजार तर नेकलेसची किंमत ८० हजारांच्या पुढे आहे. लग्नसराईत बाजाराला तेजी येण्याचे संकेत आहेत.

त्यात ग्राहकांच्या आवडीनुसार व नवनवीन पद्धतीचे दागिने सराफा व्यावसायिकांनी उपलब्ध केले आहे. सध्याचा ट्रेंड पाहता विवाहाचे दागिने खरेदी करताना हिऱ्याचे मंगळसूत्र, हिऱ्याच्या अंगठ्या, नेकलेसची मागणी होते. नाकातील डायमंडची फुली तीन हजार, महिलांची अंगठी ६,९००, तर पुरुषांच्या अंगठीची किंमत १०,५०० पासून सुरू होते. कानातील टाॅप्स सरासरी ८ हजार रुपये किमतीचे आहेत, असे व्यावसायिक अक्षय सराफ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...