आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर आणि सावदा परिसरात पशुधनावर आलेल्या लंपी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ हजार ३५१ जनावरांना लस टोचण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभाग रावेरचे सहआयुक्त संजय धांडे, येथील पशुवैद्यकीय अधिकारी नीलेश राजपूत यांच्यासह पाच टीम लसीकरणासाठी तयार केल्या आहे. शहर परिसरातील ५ कि.मी.बाहेर जनावरांना लस टोचण्याचे काम सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या ५ ऑगस्टच्या आदेशानुसार रावेर तालुक्यातील रसलपूर, विवरा, सावदा, रोझोदा, चिनावल या ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीज या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने, एल एचडी आजाराची जनावरे आढळल्याने व या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या गावांच्या संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रास बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेे. तेथील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून त्यांच्या ५ किमी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला. या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १० किमी परिघात जनावरांना गोटपॉक्स लसीकरण तत्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
शेतकरी, व्यापाऱ्यांची झाली गैरसोय
परिसरात भरणारा हा सर्वात मोठा गुरांचा बाजार असून त्यात विविध राज्यातून म्हैस, बैल व पशुधन खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, पशुपालक येतात. रविवारी हा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. त्यात पोळा सणाच्या आधीच या बाजारावर ऐनवेळी बंदी आल्याने सर्वांची कुचंबणा झाली आह
आजाराला आळा घालण्यासाठी निर्णय
येथे परिसरातील सर्वात मोठा गुरांचा बाजार भरतो. परंतु या परिसरात लंपी स्कीन डिसीज या साथ रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना झाल्याने ७ ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत गुरांचा बाजार, खरेदी-विक्री व्यवहार व गुरांची आवक- जावक बंद केल्याची माहिती सावदा बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी दिली. पुढील आदेशानंतर बाजार सुरू करण्याची माहिती सर्वांना कळवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.