आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर्नाटकातील लिची खातेय भाव; गुणकारी असल्याने पसंती

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोड, रसाळ आणि थंड असे दक्षिण चीनमधील लिची हे फळ सर्वांनाच आवडते. लिची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडित असलेले विकार काढून टाकते. लिचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्यूमरची निर्मिती होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. लिचीमधील फ्लेवोनॉइड्स आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. सध्या बाजारात कर्नाटकातून लिची विक्रीस आली आहे.

लिची खाण्याचे फायदे
बीटा कॅरोटीन आणि ओलिगोनोलने भरपूर लिची हृदय स्वस्थ ठेवते.लिची कॅन्सर कोशि‍कांना वाढण्यापासून थांबवण्यात मदतगार ठरते.लिचीचे सेवन बद्धकोष्ठतेपासूनआराम मिळण्यासाठीही केला जातो.लठ्ठपणा कमी करण्यासाठीही लिचीचे सेवन केले जाते. त्याशिवाय हे इम्यून सिस्टमला बूस्ट करण्याचे काम करते.

आरोग्यदायी घटक
लिचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरीत्या गोडवा असल्याने तत्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो. यामुळे तत्काळ ऊर्जा मिळते. बाजारात विक्रीस आलेले लिची. लिचीमध्ये फॅट्स कमी आणि फायबर घटक मुबलक असल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे तसेच अँटी-व्हायरल गुण असल्याने संक्रमणाविरोधात लढणे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. - डॉ. देवानंद सोनार, आहारतज्ज्ञ, जळगाव

बातम्या आणखी आहेत...