आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट शिपाई पुरस्कार:साकेगाव येथील मदन काळे यांचा महसूलदिनी जळगाव येथे गौरव

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकेगाव येथील रहिवासी मदनराव गंभीर काळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल प्रशासनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन उपस्थित होते. मदनराव काळे एका हाताने दिव्यांग आहेत. तरीदेखील त्यांनी आपल्या कामातील प्रामाणिकपणा व जिद्द कायम ठेवली. साकेगाव येथील कोतवाल ते जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई पर्यंत मजल गाठली. उत्कृष्ट शिपाई हा पुरस्कार मिळवला. सरपंच योगिता सोनवणे, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, दिलीप पाटील, सुरेश पाटील, अनिल पाटील आदींनी त्यांचेकौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...