आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात कोणत्याही प्रकारची जादू अस्तित्वात नाही. जादू म्हणजे हातचलाखी आणि न समजलेले विज्ञान असते, असे प्रतिपादन भुसावळचे सुप्रसिद्ध जादूगार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी श्यामकुमार वासनिक यांनी केले. विज्ञान व हातचलाखीवर आधारित जादूच्या विविध प्रयोगांचे त्यांनी बोदवड महाविद्यालयात सादरीकरण केले. राष्ट्रीय विज्ञान सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
संस्थेचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल, प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जादूचे विविध प्रयोग व त्या मागील विज्ञानावर आधारित मॅजिक शोचे आयोजन, शास्त्रोत्सव मंडळातर्फे नुकतेच करण्यात आले होते. मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या या कार्यक्रमात सुरज गणवीर, उपप्राचार्य डॉ.व्ही.पी.चौधरी, प्रा.पी. एस. महाले, डॉ. अजय पाटील, डॉ.गीता पाटील, नरेंद्र जोशी, डॉ.अनिल बारी, डॉ. चेतनकुमार शर्मा, डॉ.मनोज निकाळजे, डॉ.वंदना नंदवे, डॉ.वैशाली संसारे, डॉ.अमर वाघमोडे, डॉ. अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाण्याने दिवा पेटवून उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी आश्चर्यचकीत
मंत्राने दिवा पेटवणे, हवेतून वस्तू निर्माण करणे, कागदापासून नोट बनवणे असे प्रयोग सादर करून वासनिक यांनी विद्यार्थ्यांना आश्चर्यचकीत केले. सुशिक्षित लोकांनी कुठलीही भीती न बाळगता बुवाबाजीला विरोध केला पाहिजे, असे आवाहन प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.