आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यंदा महालक्ष्मीचे थ्री डी स्वरुपातील मुखवटे ; एका सेटची किंमत 800 ते 5 हजारांपर्यंत

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शनिवारी महालक्ष्मी मातेचे आगमन होईल. दरम्यान, सर्वत्र डिजिटलायझेशन होत असताना महालक्ष्मीचा उत्सव देखील त्यास अपवाद नाही. यंदा तर प्रथमच महालक्ष्मीचे थ्री डी स्वरूपातील मुखवटे बाजारात विक्रीस आले आहेत. त्यात महालक्ष्मीच्या गालावर खळी पडलेली दिसते आणि थ्री डी इफेक्टमुळे आपण घरातील कोणत्याही कोपऱ्यातून पाहिल्यास मूर्ती आपल्याकडेच पाहत आहे असा भास हाेताे.

शनिवारी महालक्ष्मीचे आगमन होत असल्याने शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होते. विशेष करून महालक्ष्मी मातेचे मुखवटे व इतर गरजेचे साहित्य खरेदीवर भर दिसला. दोन वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठेही उत्साह दिसला. शहरात पेण, धुळे येथून महालक्ष्मीचे मुखवटे विक्रीसाठी येतात. आतून शाडूमातीचे असलेल्या या मुखवट्यांना पीओपीची आकर्षक केलेली असते. त्यामुळे महालक्ष्मीचे मुखवटे आकर्षक दिसतात. अनेक भाविक घरातील जी वस्तू खराब झाली असेल ती खरेदी करतात, तर काही महालक्ष्मी मातेचा संपूर्ण सेटच विकत घेतात. ८०० रूपयांपासून ते ५ हजारांपर्यंत त्याची किंमत आहे. या सेटमध्ये महालक्ष्मीचे २ मुखवटे, २ बाळ, काेठी, साडी, सेला, पावले आदी साहित्याचा समावेश असतो. महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या साड्या शिवून तयार मिळतात. शहरात महालक्ष्मीचे सुमारे ६० सेट विक्री हाेतात. यातून सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल हाेते.

पैठणीसाेबत नऊवारी साडीलाही हाेतेय मागणी
गाैरीच्या साड्यांमध्ये यंदा नऊवारी, पेशवाईला जास्त मागणी आहे. साधारण एक ते दोन महिने अगाेदरच ही तयारी सुरू हाेते. येवला, बेळगाव येथून पैठणी व अन्य कापड मागवतो.
राहूल मुळे, विक्रेते, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...