आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हे मन, मनगट व मेंदू बळकट करते. शिक्षणातून माणसाला खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. व्यक्ती वैचारिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अंगाने डोळस झाली पाहिजे. माणसाचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद शिक्षणात आहे, हे महात्मा फुले यांनी जाणले होते. त्यांच्या शैक्षणिक विचारांनी समाज व राष्ट्रात सर्वंकष क्रांती शक्य आहे, असे प्राचार्य डॉ.वासुदेव वले यांनी सांगितले. शहीद भगतसिंग फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ. वर्षा नेहेते, प्रा.डॉ.दिनेश पाटील, समाजसेवक रघुनाथ सोनवणे, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, प्रागतिक मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे, नॉलेज सेंटरच्या वांशिका खोब्रागडे, संजयसिंग चव्हाण, प्रशांत तायडे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य वले म्हणाले की, बलशाली राष्ट्र ही संकल्पना केवळ आणि केवळ शिक्षणामधून साकार होईल. हे लक्ष्यात घेऊन महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात शिक्षण सर्वांसाठी खुले केले. बहुजनांच्या जीवनात शिक्षण आणणारे महात्मा फुले यांचे कार्य क्रांतिकारक आहे. यानंतर खुल्या, कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक गटातील २८ विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस देऊन गौरव झाला. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश रायपुरे, सूत्र संचालन विनोद बाऱ्हे, तर आभार देवेंद्र तायडे यांनी मांडले. प्रा.डॉ.जतीन मेढे, समाधान जाधव, देवेंद्र तायडे, सुशील रायपुरे, भूपेंद्र तायडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.