आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:मुंदाणेत मका, ज्वारी, बाजरी आडवी‎

मुंदाणे‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यातील मुंदाणे‎ परिसरात ६ रोजी रात्री जोरदार‎ वादळाने तडाखा दिला. त्यामुळे‎ शेतातील मका, ज्वारी, बाजरी ही‎ पिके आडवी झाली.‎ किशोर पाटील, शोभाबाई‎ पाटील, लक्ष्मण पाटील, मधुकर‎ पाटील, वाल्मिक पाटील, पांडुरंग‎ पाटील, अशोक पाटील, भास्कर‎ पाटील, दगडू पाटील, अल्काबाई‎ पाटील आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे‎ प्रचंड नुकसान झाले.

नुकसानीचा‎ त्वरित पंचनामा करून नुकसान‎ भरपाई मिळावी, अशी मागणी माजी‎ सरपंच डी.के पाटील, पोलिस‎ पाटील अशोक पाटील, ग्रामपंचायत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी‎ केली आहे. एकीकडे कापसाला‎ भाव नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या‎ घरात पडून आहे. तर रब्बी‎ पिकांसाठी उसनवारी करून पैसे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेऊन शेतकऱ्याने हंगामासाठी खर्च‎ केला आहे. आता वादळाचा‎ तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या‎ तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास‎ हिरावला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...