आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:भारत विद्यालयात मूर्ती बनवा स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

न्हावी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्हावी (ता.तालुका) येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्राथमिक शाळेने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भुसावळ येथील कलाशिक्षिका वैशाली खाचणे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर स्पर्धेतील तिन्ही गटातील विजेत्यांची निवड झाली.

मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी, उप मुख्याध्यापिका पुष्पा चोपडे, पर्यवेक्षक एन.एन.अजलसोंडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एच.तळेले, गोकुळ इंगळे, पर्यावरणप्रेमी डी.पी.बोरोले, पी.एल.तळेले, कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कला शिक्षक व्ही.ओ.चौधरी, सी.पी.भालेराव यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.

असे आहेत विजेते... तिसरी ते चौथी गट : युक्ता नीलेश कोल्हे, वेदिका बोरोले, लोकेश कापडे, एंजल चोपडे. पाचवी ते सातवी गट : चेतन बेंडाळे, तेजस गाजरे, राहुल इंगळे, रिया विकास. आठवी ते दहावी गट : विशाखा कमलाकर चौधरी, दर्शन निंबाळे, युक्ता बोरोले, निनाद कोल्हे.

बातम्या आणखी आहेत...