आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोलेनाथ भक्ताच्या अंतःकरणातील भाव ओळखतात. त्यामुळे देवासोबत मित्रत्वाचे नाते जोडा. त्यामुळे सुख-दुखाच्या गोष्टी सांगता येतात, असे निरुपण राष्ट्रीय कथा प्रवक्ते मंगेश महाराज दाताळकर यांनी केले. शहरातील प्रोफेसर कॉलनीत जय मातृभूमी मंडळातर्फे आयोजित संगीतमय शिव महापुराण कथा व संकीर्तन सोहळ्यात बुधवारी ते बोलत होते. जय मातृभूमी मंडळ व मित्र परिवारातर्फे शिव महापुराण कथेचे आयोजन केले आहे. मंगेश महाराज दाताळकर वराडे ता.मुक्ताईनगर हे कथा वाचन करत आहेत. ते म्हणाले की, चुकीचे कर्म करणाऱ्यांना परमेश्वर कोणताही थारा देत नाही. देवाजवळ दिवा लावून देवालयातच नव्हे तर स्वत:च्या जीवनात प्रकाश पडतो. यामुळे दररोज देवालयात दिवा लावला गेला पाहिजे. भगवान भोलेनाथ प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. व्यावहारिक जीवनात जगाचा विचार करु नका. एकदा काम संपले की तुम्ही जगासाठी वाईट व्हाल. त्याऐवजी निस्सिम भक्ती करा, असे महाराज म्हणाले.
भुसावळ शहरातील मातृभूमी चौकात आयोजित शिवपुराण कथेला महिला भाविकांचा असा प्रतिसाद आहे.सजीव आरास आकर्षण शिव महापुराण कथेत दररोज प्रसंगानुरुप सजीव आरास साकारली जात आहे. कथेतील प्रसंगावर चित्र भाविकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न त्यातून होते. या कथा श्रवणाला महिलांची जास्त उपस्थिती आहे.सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली बुधवारी मंगेश महाराजांनी सृष्टीच्या उत्पत्तीची आणि ब्रह्मा, विष्णू व महेश अवताराची कथा सांगितली. भगवान विष्णूंनी उपासना, भगवान कुबेरावर असलेली शिवकृपा, रावणावर असलेल्या शिवकृपेचे वर्णन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.