आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिला जेरबंद:मंगळसूत्र चोरले ; दोन महिलांना १० तासांत अटक

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय मातृभूमी गणेश मंडळाजवळ बेंटेक्स ज्वेलरी खरेदी करताना दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत पोलिसाच्या पत्नीचे मंगळसूत्र लांबवले. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजता घडली. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या १० तासांत जालना जिल्ह्यातील दोन महिलांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन मंगळसूत्रांसह सोन्याचे ६ मणी जप्त केले. शारदा धनराज चव्हाण (वय ३०) व रेखा अफसर चव्हाण (वय ६२, दोन्ही रा.वझिदखेडा, पिंपळगाव कोलते, जि.जालना) अशी महिलांची नावे आहेत.उषा श्रीकृष्ण चाटे (रा.पोलिस वसाहत, भुसावळ) यांचे पती भुसावळ शहर वाहतूक शाखेत कर्तव्यावर आहेत.

मंगळवारी उषा चाटे या महिलांसह मातृभूमी चौकात गणपतीची आरास पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेथील दुकानावर त्या बेंटेक्सचे दागिने पाहात होत्या. यावेळी दुकानावर झालेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी त्यांचे दोन मंगळसूत्र व सहा सोन्याचे मणी लांबवले. ही माहिती चाटे यांनी बाजारपेठ पोलिसांना देत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दहा तासातच मातृभूमी चौकातून शारदा चव्हाण व रेखा चव्हाण यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपयांचे चोरीचे दागिने जप्त केले. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, प्रशांत परदेशी, नीलेश चौधरी व सहकाऱ्यांनी तपास केला.

बातम्या आणखी आहेत...