आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातांदलवाडी फाटा ते मांगलवाडी दोन किमीचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून, हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांचे किरकोळ अपघात वाढले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. हा परिसर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेतात केळी भरण्यासाठी अवजड वाहने येत असतात.
रस्त्यावर लहान व मोठे ट्रॅक्टर, ट्रक अशा अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. खड्डे चुकवतांना या वाहनांचे अपघात होतात. रस्ता आधीच अरुंद असून रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली आहेत. वाहनधारक तसेच रस्त्याने ये जा करणारे शेतकरी-शेतमजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला साईडपट्टया नसल्यासारख्या असून, त्यामुळे एसटी महामंडळाची बसही बंद आहे. बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्रास वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.