आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाटक, साहित्य अभिरुची वाढावा या उद्देशाने येथील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे शनिवारी (दि.१८) मराठी गजल मुशायारा व रविवारी ‘सोडी गेला बाबा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या सभागृहात दोन दिवस सायंकाळी ८ वाजता हे कार्यक्रम होतील. मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील गजलकार कमलाकर आबा देसले यांच्या स्मरणार्थ ब्रह्मकमळ मुंबई यांच्या माध्यमातून मराठी गजल मुशायरा होईल. सतीष बडवे (बीड), रावसाहेब कुंवर (धुळे), नितीन देशमुख (अमरावती), आनंद पेंढारकर (मुंबई), अमोल शिरसाठ (अकोला), संतोष कांबळे (नाशिक), एजाज शेख (अमरावती), नीलेश कवडे (अकोला), गोपाल मापारी (अकोला), विशाल राजगुरु (मुंबई) हे गजलकार सहभागी होतील.
निवेदन नागपूरचे नरेंद्र गिरीधर असतील, सुत्रसंचालन भुसावळचे हारुन उस्मानी हे करतील. तर रविवारी (दि.१९) उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ निर्मित ‘सोडी गेला बाबा’नाटकाचा प्रयोग होईल. नानासाहेब देवीदास फालक यांच्या स्मरणार्थ हा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक अनिल कोष्टी, दिग्दर्शन सहाय्य सुशील पाटील, प्रकाश योजना प्रथमेश जोशी, संगीत पुष्कराज शेळके, हिमांशू पाटील, रंगभूषा व वेशभूषा संजय चव्हाण यांची आहे. कार्यक्रमाला ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, राधेश्याम लाहोटी, डॉ. विनायक महाजन, अनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत, सुरेश पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, अश्विनकुमार परदेशी, विजय चिंधडे, सिद्धेश तावडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.