आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घट:शीतलहरींमुळे चार दिवसांत सहा अंशांनी घटले कमाल तापमान

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जानेवारीपर्यंत कमाल तापमानात घट, पण किमान सरासरीएवढेच

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे दोन दिवसांपासून शहरात गारठा वाढला आहे. रात्रीच्या किमान तापमानात स्थिरता असली तरी गेल्या चार दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात ६ अंशांची घसरण झाली आहे. २९ डिसेंबरला कमाल तापमान ३०.८, तर ३१ डिसेंबरला ते २४.५ अंशांपर्यंत घसरले. १ जानेवारीला देखील काहीसे असेच वातावरण असेल तर विरळ ढग देखील होते. हिमालयातील बर्फवृष्टीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे.

या शीतलहरींमुळे भुसावळसह विभागातील तापमानाचा पारा घसरला आहे. प्रामुख्याने गेल्या तीन दिवसांत शहराचे कमाल तापमान ६.३ अंशांनी घसरले. मात्र, दोन दिवसांपासून किमान तापमान पारा १४ ते १५.१ अंशांदरम्यान आहे. तत्पूर्वी, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १७.३, तर कमाल तापमान ३०.७ अंशांवर होते. मात्र, आता या तापमानात घसरण झाली. शुक्रवारी १५.१ किमान तापमान नोंदवले गेले. यामुळे हुडहुडी वाढली.

४ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे
थंडीची लाट येण्यापूर्वी काही दिवस अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यातच महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली होती. मात्र, आता ढगाळ वातावरण निवळून थंडीचे पुनरागमन झाले आहे. पुढील ४ जानेवारीपर्यंत हवामान मुख्यत्वे कोरडे राहील. ११ जानेवारी पर्यंतच्या सुधारित अंदाजानुसार कमाल तापमानात घट येईल, तर किमान तापमान सरासरीएवढे राहणार असल्याचे पुणे येथील कृषी हवामान शास्त्र विभागाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...