आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमणूक:क्रीडा संकुलात वाढीव‎ कामांना मार्चचा मुहूर्त‎ ; 7.32 कोटींची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका क्रीडा संकुलासाठी ७ कोटी‎ ६२ लाखांचा निधी मिळाला होता.‎ या निधीतून नियोजित कामांसाठी ‎निविदा प्रक्रिया सुरु आहे. यातील ‎ ‎ सहभागी ठेकेदारांच्या तांत्रिक व ‎आर्थिक बाजू तपासणीचे काम ‎सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‎केेले जात आहे. दोन महिन्यांत ही‎ सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर ‎ ‎ देण्यात येईल. यानंतर दुसऱ्या‎ टप्प्याचे काम मार्च महिन्यात सुरू‎ होऊ शकते.‎ भुसावळ तालुका क्रीडा‎ संकुलासाठी ७ कोटी ९२ लाख‎ रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, निधी मंजूर होऊन दोन‎ वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही‎ निविदा का निघाली नाही? याचा‎ आढावा आमदार सावकारे यांनी‎ वारंवार घेतला. अखेर या‎ कामासाठी पुणे येथील एक‎ सल्लागाराची नेमणूक करण्यात‎ आली. नंतर गेल्या महिन्यात निविदा‎ प्रक्रिया सुरू करण्यात आली. ती‎ लवकरच पूर्ण होणार आहे.‎

सुरक्षारक्षक नेमणार‎ तालुका क्रीडा संकुलात नवीन‎ कामांसोबतच जुन्या कामांची‎ दुरुस्ती होणार आहे. यामुळे‎ संकुलाचे पूर्णपणे नूतनीकरण‎ होईल. सध्या इमारतीमधील‎ टाईल्स, लाईटफिटिंग,‎ बाथरुम-टॉयलेटच्या टाइल्स व‎ साहित्याची मोडतोड केली आहे.‎ त्याचीही दुरुस्ती होईल.‎ मार्क धर्माई, तालुका क्रीडा‎ अधिकारी, भुसावळ‎

बातम्या आणखी आहेत...