आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादवाखाना टाकण्यासाठी माहेरहून १५ लाख रूपये आणावे यासाठी वरणगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ झाला. याप्रकरणी रावेर येथील सासरच्या शेख परिवाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वरणगावचे माहेर असलेली बुशरा खान हुज्जपा शेख (वय २०) हिचे रावेर येथील सासर अाहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी हुज्जपा रईस शेख याचेसोबत तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती हुज्जपा, सासरे रईस शेख नियाज मोहंमद, दीर तला शेख रईस शेख, आदीश शेख, नणंद सना शेख अझहर, नंदोई अजहर शेख यांनी हुंड्यासाठी छळ केला. दवाखाना टाकण्यासाठी माहेरहून १५ लाख रूपये आणावे अशी मागणी कली. यानंतर किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास दिला.
गर्भवती असताना वरणगाव येथे माहेरी सोडून दिले. सध्या या विवाहितेस सहा महिन्यांची मुलगी आहे. दरम्यान, ईदला तिचा पती वरणगाव येथे आला. त्याने पुन्हा १५ लाखांची मागणी करून वाद झाला. पैसे देण्यास नकार देताच हुज्जपा शेख याने तीन वेळा तलाक म्हणून निघून गेला. त्याने राष्ट्रीय तीन तलाक बंदी कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी हुंड्यासाठी छळ व तीन तलाक कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार नावेद अली करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.