आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:एक लाखासाठी विवाहितेचा छळ, चौघांविरूद्ध गुन्हा; माहेरहून एक लाख रूपये आणावे या मागणीसाठी भावनाला माहेरी पाठवून देण्यात आले

यावल18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नायगाव येथील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेत व माहेरातून एक लाख रूपये आणावे या मागणीसाठी छळ झाला. याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.

भावना अधिकार पाटील असे फिर्यादी विवाहितेचे नाव आहे. त्यांचे लग्न १२ मे २०१९ रोजी अधिकार भगवान पाटील (रा.इंदापिंप्री ता.अमळनेर) यांचेशी झाले होते. लग्नानंतर तिचे पती बदलापूर (मुंबई) येथे घेऊन गेले. मात्र, एक महिन्यानंतर चारित्र्यावर संशय घेणे घेत मारहाण व शिविगाळ सुरू केली. यानंतर तिला मुलगी झाली. ती आता दोन वर्षांची आहे. दरम्यान, माहेरहून एक लाख रूपये आणावे या मागणीसाठी भावनाला माहेरी पाठवून देण्यात आले.

मात्र, माहेरच्या मंडळींना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी तिला पुन्हा नांदावयास पाठवले. तरीही पती अधिकार भगवान पाटील, सासरे भगवान रामभाऊ पाटील, सासू कल्पना पाटील व दीर विकास भगवान पाटील यांनी छळ सुरूच ठेवला. सोमवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...