आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पारोळा येथील विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; रुपाली एकनाथ चौधरी यांनी फिर्याद दिली

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आझाद चौकातील माहेर व शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील सासर असलेल्या विवाहितेचा माहेरहून एक लाख रुपये आणत नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी, सासरकडील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपाली एकनाथ चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे पती एकनाथ चौधरी, सासरे भिका चौधरी, सासू लताबाई चौधरी यांच्यासह कमलेश चौधरी, धर्मा चौधरी व गुंताबाई चौधरी यांनी २०१४ ते २०२२ दरम्यान माहेरहून एक लाख रुपये आणत नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याने गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...