आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट:तापमानाने बाजारपेठेत मंदीची लाट; गजबजणारे रस्ते सामसूम

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहरात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी ४७.२ अंश तापमान होते. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट असून बाजारपेठेत तर जणू अघोषित संचारबंदीने मंदीची लाट पसरली आहे. दरम्यान, तापमानापासून सूर्याच्या प्रखर अतिनील किरणांमुळे डोळ्यांना जपणे, दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पिणे, तीन वेळा ताक, रसदार फळांचे सेवन करावे. ज्येष्ठ नागरिक, बालके व गरोदर मातांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी दिला आहे.

बाजारपेठेत मंदीचा लाट
गांधी पुतळा, जामनेर रोड, आठवडे बाजार, नृसिंह मंदिर ते डिस्को टॉवर, अप्सरा चौक, मरिमाता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, मॉर्डनरोड या बाजारपेठेच्या भागात सकाळी ११ वाजेपासून शुकशुकाट असतो. सायंकाळी वर्दळ दिसते.

बसस्थानकावर ओआरएस
एसटीचा पत्रा तापून प्रवाशांना उष्माघात होऊ शकतो. अशा आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना मदतीसाठी पालिका रुग्णालयाने बसस्थानक प्रशासनाकडे ओआरएस, इलेक्ट्रॉल पावडरचे पाऊच दिल्याचे डॉ.कीर्ती फलटणकर यांनी सांगितले.

बालकांची विशेष काळजी घ्या
उच्चांकी तापमानामुळे गेल्या चार दिवसांत सनस्ट्रोक, अतिसाराचे बाल रुग्ण वाढले आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान बालकांना खेळण्यासाठी घराबाहेर सोडू नये. दिवसभरात नैसर्गिक थंड पेयांचे सेवन करावे. ओआरएस, इलेक्ट्रॉल सारख्या शर्करा व मिठाचे प्रमाण असलेल्या पावडरचा वापर वाढवावा.
- डॉ.पंकज राणे, बालरोगतज्ज्ञ, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...