आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:हुतात्मा, इगतपुरी मेमू आजपासून पुन्हा धावणार

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव ते भुसावळदरम्यान घेतलेला ब्लॉक मंगळवारी संपला. त्यासाठी रद्द केलेल्या गाड्या बुधवारपासून सुरळीत धावतील.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ५ ते ६ डिसेंबरला ब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक मंगळवारी संपल्याने बुधवारपासून (दि.७) या मार्गावरील हुतात्मा, सेवाग्राम, इगतपुरी मेमू, देवळाली शटल, नंदूरबार एक्स्प्रेससह ३४ गाड्या सुरळीत धावणार आहेत. यामुळे विभागातील सर्वसामान्य प्रवाशांची झालेली गैरसोय दूर होईल.

बातम्या आणखी आहेत...