आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:स्वत:चा कारखाना चालावा म्हणूनच बंद पाडला मसाका; गिरीश महाजन

न्हावी/फैजपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुल्लक रकमेपोटी फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जाणीवपूर्वक बंद पाडून विक्री करण्यात आला. केवळ आपला कारखाना सुरू राहिला पाहिजे, या स्वार्थापोटी मकासाचा बळी दिल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा नामोल्लेख टाळून केली. मसाकाची पुनरावृत्ती जिल्हा दूध संघात होऊ नये म्हणूनच आम्ही सर्वांनी दूध संघ निवडणुकीत लक्ष घातल्याचे ते म्हणाले.

दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी फैजपूर येथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) गटाचा मेळावा झाला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, दूध संघाने तयार केलेले तूप साताऱ्यात वाई येथे कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवले जाते. त्यापोटी दूध संघाला ५० लाख रुपये भाडे द्यावे लागत आहे. दूध संघाला आपल्याकडे कोल्ड स्टोअरेज मिळत नाही. ३०० कामगारांची गरज असताना ५०० कामगारांची भरती केली. आता ३२ दिवसांमध्येच फॅट का चांगला लागतोय? आधी चांगला फॅट लागून शेतकऱ्यांना दुधाचा भाव का भेटत नव्हता? अशी विचारणा केली. तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री थांबायला हवी.

त्यासाठी मंत्री गिरीश महाजन व आपण प्रयत्न करू असे पालकमंत्री पाटील म्हणाले. आमदार अनुक्रमे मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील, संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे व अमोल जावळे, स्मिता वाघ, नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, नरेंद्र नारखेडे, शरद महाजन, नितीन चौधरी, मुन्ना पाटील, ठकसेन पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...