आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:रावेरात बौद्ध समाजाचा सामूहिक विवाह सोहळा, 51 जोडप्यांचे झाले शुभमंगल; वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक

रावेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने आयोजित बौद्ध धम्मीयांचा दहावा सामूहिक विवाह सोहळा ८ मे रोजी पार पडला. त्यात तब्बल ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.

रावेर येथे सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव, तर उद्योजक दीपरत्न तायडे उद्घाटन होते. दीपपूजा भूमी अभिलेखचे उप अधीक्षक राजू घेटे, विशाल गजरे, संतोष तायडे यांच्या हस्ते झाले. त्रिशरण, पंचशील भुसावळ येथील भंते अचरानंद महाथेरो यांनी घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी, माजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, माजी पं.स.सदस्य दीपक पाटील, सुरेश नाईक, शेखर बडगे, डॉ.सुरेश पाटील, सर्फ राज तडवी, समाज कल्याण विभागाचे आर.सी.पाटील, तालुका समन्वयक शिला अडकमोल, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजुमदार, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जन क्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान आर्मी संस्थापक जगन सोनवणे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, योगेश गजरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, निंभोरा सिम सरपंच राजू सवर्णे, तांदलवाडी सरपंच सुरेखा तायडे, साळशिंगी उपसरपंच सोनल गायकवाड, पंकज वाघ, सावन मेढे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी धम्म रत्न म्हणून विजय अवसरमल, दिलीप पोहेकर, सदाशिव निकम, युवराज तायडे, दीपक तायडे यांचा सन्मान झाला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...