आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची डोकेदुखी:भुसावळात इलेक्ट्रिक दुकानातून साहित्य चोरी ; भुसावळात चोरटे मुक्कामी

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खडका गावाजवळील व्यापारी संकुलातील इलेक्ट्रिक दुकानातून चाेरट्यांनी ६७ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. खडका गावाजवळील नवीन ईदगाह व्यापारी संकुलात मोहंमद फिरोज मोहंमद नसीम खान यांचे आयान इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. सोमवारी रात्री १० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी १० वाजता दुकानावर आल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. यावेळी चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी दुकानामागील खिडकी तोडून आत प्रवेश करत ६७ हजारांचे साहित्य लांबवले. त्यात वीज पंप, कुलरच्या मोटर्स, पंखे, इस्त्री, केबल, तांब्याची तार, हॅण्ड ग्राइंडर अशा साहित्याचा समावेश आहे. खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...