आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मातृभूमी चौक ते रामदेवबाबा मंदिरापर्यंतच्या मार्गावर पालिकेने ३० सेंट्रल पोल बसवले. तेथे आठवडाभरात ७० वॅटचे ६० दिवे बसवले जाणार आहेत. शहरातील मुख्य रस्ते वगळता शहरातील अंतर्गत भागात प्रथमच या पद्धतीने सेंट्रल पोल बसले आहेत. परिणामी नवीन वर्षात हा भाग उजळून निघणार आहे.
शहातील मातृभूमी चौक ते बल्लाळेश्वर चौक व पुढे रामदेवबाबा मंदिरापर्यंतच्या प्रमुख रस्त्यावर २५ वर्षांपासून सेंट्रल पोल नव्हते. सहा ते सात वर्षांपूर्वी या रस्त्यावर दुभाजक बांधले गेले. त्यामुळे सेंट्रल पोलची गरज समोर आली. तेथे सेंट्रल पोल बसवण्यासाठी माजी नगरसेवक किरण कोलते यांनी प्रयत्न केले.
दुभाजकांची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता
मातृभूमी चौक हा शहरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तेथील मार्गावर यापूर्वीच रस्ता दुभाजक तयार झाले आहेत. त्यांची रंगरंगोटी करावी अशी मागणी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे. किरण कोलते, माजी नगरसेवक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.