आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा जोर वाढला:एकाच दिवसात पारा दोन अंश खाली ; किमान तापमान घसरून 15.5 अंशांवर

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. १७.६ अंशांवर स्थिरावलेला किमान तापमानाचा पारा आता १५.५ अंशांवर पोहोचला आहे. एकाच दिवसांत दोन अंशांनी तापमान कमी झाले आहे. येत्या चार दिवस हे तापमान स्थिर राहिल. तर ७ ते १० डिसेंबर दरम्यान तापमानाचा पारा १३ अंशांपर्यंत घसरेल असा अंदाज अॅक्युवेदरने वर्तवला आहे.

भुसावळ शहरात दिवाळीपासून थंडीचा तडाखा वाढला होता. मात्र यानंतर थंडीत घट झाली. गेल्या आठवड्यापासून मात्र तापमान स्थिर होते. शहराच्या किमान तापमानाचा पारा १७ ते १८ अंशांच्या दरम्यान होता. शहराचे बुधवारचे किमान तापमान १७.६ अंशांवर होते. तर शुक्रवारी हे तापमान सरासरी दोन अंशांनी कमी होऊन १५.५ अंशांवर घसरले आहे. तापमानात एकाच दिवसात झालेल्या घसरणीमुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान ३ ते ६ डिसेंबर दरम्यान किमान तापमानाचा हा पारा कायम राहिल. यानंतर ७ ते १० डिसेंबरच्या दरम्यान तापमानात पुन्हा घट होईल. किमान तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत घसरेल, तर दिवसाचे कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत राहिल, असा अंदाज अॅक्युवेदर डॉट कॉम संकेतस्थळाने वर्तवला.

बातम्या आणखी आहेत...